इराणचे ब्रम्हास्त्र ’सेजिल’… चर्चा तर होणारच! 2 हजार किमीची रेंज, 6000 किमीचा वेग, 700 किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता

इराणचे ब्रम्हास्त्र ’सेजिल’… चर्चा तर होणारच! 2 हजार किमीची रेंज, 6000 किमीचा वेग, 700 किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले-प्रतिहल्ले करत आहेत. या सर्व घटनेत इराणच्या सेजिल क्षेपणास्त्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. इराणने पहिल्यांदा इस्रायलवर हल्ल्यासाठी सेजिल क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. या क्षेपणास्त्राला 2 हजार किलोमीटरपर्यंत रेंज आहे. प्रति तास 6000 किमीचा वेग असून 700 किलोपर्यंत स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. या मिसाईलची तुलना आता रशियाच्या इस्केंडर मिसाईलशी केली जात आहे. सेजिल एक बॅलेस्टिक मिसाइर आहे. याला इराणने विकसित केले आहे. त्यामुळे ही मिसाईल मध्यम रेंजची स्वदेशी मिसाईल आहे. या मिसाईलची रेंज 2 हजार ते अडीच हजार किलोमीटरपर्यंत आहे. त्यामुळे या मिसाईलने पश्चिम आशिया आणि पूर्व युरोपपर्यंत मारा करण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. याची लांबी 18 मीटर आहे. या मिसाईलचा वेग 6 हजार किलोमीटर आहे. हे मिसाईल आयरन डोम आणि एरो बॅटरीसारख्या एअर डिफेन्स सिस्टमला चकवा देऊ शकते. या मिसाइलला लपवणे सुद्धा सोपे आहे. तसेच यात परमाणू शस्त्रs घेऊन जाण्याची क्षमता आहे

पहिल्यांदाच युद्धात वापर

इराणने 35 वर्षापूर्वी सेजिल मिसाईलला बनवले आहे. 13 नोव्हेंबर 2008 रोजी याची पहिली चाचणी घेण्यात आली. इस्रायलविरुद्धच्या युद्धात पहिल्यांदाच सेजिल मिसाईलचा वापर केला आहे. या मिसाईलला तत्काळ लाँच केले जाऊ शकते. दक्षिण इस्रायलचे शहर बीरशेबामध्ये हल्ल्यासाठी याचा वापर करण्यात आला असून यात प्रचंड नुकसान झाले आहे. रहिवाशी इमारती शिवाय, हॉस्पिटलचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे. इराणने दोन मिसाइलच्या मदतीने तेल अवीववर जोरदार हल्ले केले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;