चिंताजनक! देशात बनवलेली 186 औषधे चाचणीत फेल

चिंताजनक! देशात बनवलेली  186 औषधे चाचणीत फेल

देशात बनवण्यात आलेल्या तब्बल 186 औषधांचे नमुने चाचणीत फेल झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) आणि केंद्रीय प्रयोगशाळेने केलेल्या चाचण्यांमध्ये हे औषधे अपयशी ठरले आहे, अशी माहिती शुक्रवारी रात्री उशिरा देण्यात आली आहे. सीडीएससीओच्या तपासणीत हिमाचल प्रदेशातील 37 औषध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या 50 औषधांचे नमुने फेल झाले आहेत. तर 128 नमुने विविध राज्यांच्या स्वतःच्या प्रयोगशाळांनी केलेल्या चाचण्यांमध्ये अपयशी ठरले आहेत. हजारो रुपये खर्च करून औषधे केल्यानंतर सुद्धा या औषधांचा आजारांवर काहीच परिणाम करत नाही. या औषधांचा रुग्णांना फायदा होत नाही. जी औषधे चाचणीत फेल झाली आहे. त्यामध्ये आम्लपित्त, ताप, पोटात अल्सर, हृदय, उच्च रक्तदाब, सूज आणि संधिवात यासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जात आहेत. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी3 टॅब्लेट, सॉफ्ट टच फार्मास्युटिकल्स इंडिया वाकनाघाट, सोलन हे रक्तातील कॅल्शियमची पातळी कमी करण्यासाठी आणि रिकेट्स, ऑस्टियोपोरोसिस आणि हायपोपॅराथायरॉईडीझम सारख्या कमी प्लाझ्मा कॅल्शियम पातळीमुळे उद्भवणाया परिस्थितीवर उपचार करण्यासाठी किंवा प्रतिबंधित करण्यासाठी वापरले जाते.

हिमाचल प्रदेशातील 50 औषधांचा समावेश

हिमाचल प्रदेशातील 37 औषध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या 50 औषधांचे नमुने फेल झाले आहेत.हिमाचलमधील कला अंब, सोलन, बद्दी, बारोतीवाला, नालागढ, पाओंटा साहिब, उना आणि कांगडा येथील उद्योगांमध्ये निकृष्ट दर्जाची औषधे तयार केली जात आहेत. दरम्यान, सर्वात संतापजनक आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 20 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी मे महिन्यात चाचणी केलेल्या औषधांचा अहवाल सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनला दिलाच नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;