सदा सर्वदा योग तुझा घडावा
शनिवारी देशभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला. हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी 20 हजार फूट उंचीच्या सियाचीन, कांगडी आणि गलवान खोऱयात योग दिन साजरा केला. तर नौदलाच्या जवानांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या किनाऱयावर एका आयएनएसवर योग दिन साजरा केला. देशभरातील शाळा, महाविद्यालये, पर्यटन स्थळांवर योग दिवस साजरा करण्यात आला. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थ्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी देशभरात योग दिवस साजरा केला. परंतु हा ‘योग दिन’ केवळ 21 जूनला साजरा न करता वर्षातील 365 दिवस केल्यास शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा नक्कीच फायदा होईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List