Iran-Israel War – अमेरिका युद्धात उतरली, हिंदुस्थानच्याही वेगवान हालचाली; आज 2 विमानं दिल्लीत लँड होणार

Iran-Israel War – अमेरिका युद्धात उतरली, हिंदुस्थानच्याही वेगवान हालचाली; आज 2 विमानं दिल्लीत लँड होणार

इराण आणि इस्रायलमधील युद्ध दहाव्या दिवशीही सुरू आहे. या युद्धामध्ये आता अमेरिकाही उतरली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ले करत हे तळ नष्ट केले. एकीकडे दोन्ही देशांमधील संघर्ष महायुद्धाकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे हिंदुस्थाननेही वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.

इराणच्या युद्धग्रस्त भागातून आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू करण्यात आले असून आहे. आतापर्यंत 1117 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. ‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत महन एअरची दुसरी विशेष फ्लाइट W5071 शनिवारी रात्री दिल्ली विमानतळावर उतरली. या विमानातून 290 विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे आणण्यात आले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली.

इराणहून हिंदुस्थानी नागरीक आणि विद्यार्थ्यांना घेऊन रात्री साडे अकरा वाजता विमान दिल्लीत उतरले. इराणमधून आतापर्यंत 1117 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. ‘ऑपरेशन सिंधू’ने वेग पकडला असून रविवारी इराणहून येणारे आणखी दोन विमाने दिल्लीमध्ये उतरतील, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.

शनिवारी रात्री इराणहून आलेल्या विमानामध्ये 290 प्रवासी होते. यापैकी बहुतांश विद्यार्थी होते. यामध्येही सर्वाधिक विद्यार्थी जम्मू-कश्मीर राज्यातील होते. या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्यासाठी जम्मू-कश्मीर सरकारनेही बसची व्यवस्था केली आहे.

अमेरिकेच्या हल्ल्याला जुमानत नाही, अण्वस्त्र कार्यक्रम सुरुच ठेवणार; इराणच्या भूमिकेमुळे युद्धाचा भडका उडणार

दरम्यान, जम्मू-कश्मीर स्टूडेंट्स असोसिएशनने या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनवर प्रतिक्रिया दिली असून, जे कुटुंबीय आपली मुलं सुरक्षित परत येतील अशी आस लावून बसले होते त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू! इराणची अमेरिकेला धमकी, सरकारी वाहिनीवरून मोठी घोषणा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;