अमेरिकेच्या हल्ल्याला जुमानत नाही, अण्वस्त्र कार्यक्रम सुरुच ठेवणार; इराणच्या भूमिकेमुळे युद्धाचा भडका उडणार

अमेरिकेच्या हल्ल्याला जुमानत नाही, अण्वस्त्र कार्यक्रम सुरुच ठेवणार; इराणच्या भूमिकेमुळे युद्धाचा भडका उडणार

इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी ट्विट करून आणि त्यानंतर व्हाईट हाऊसमधून संबोधित करून याबाबत माहिती दिली. आता शांततेची वेळ आहे, इराणने तातडीने हे युद्ध थांबवावे, अन्यथा विनाश अटळ आहे, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. आता शांतता प्रस्थापित होईल किंवा विनाश होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या इशाऱ्यानंतरही इराण आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमावर ठाम असल्याने युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे जगाची वाटचाल महायुद्धाकडे सुरू असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे असा आरोप इराणच्या अणुऊर्जा संघटनेने केला आहे. इराणच्या अणुऊर्जा संघटनेने अमेरिकेच्या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे. संघटनेने स्पष्ट केले की ते त्यांच्या आम्ही देशाचा विकास कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही आणि इराणची अण्वस्त्र कार्यक्रम सर्व परिस्थितीत सुरू राहील, इराणच्या या भूमिकेमुळे युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

इराणच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करून अमेरिकेने मोठा गुन्हा केला आहे. आखाती देशांमध्ये अमेरिकेला कोणतेही स्थान नाही. अमेरिकेचे अध्यक्ष, युद्ध तुम्ही सुरू केले आहे, शेवट आम्ही करू. अमेरिकाही इराणच्या फायर रेंजमध्ये आहे, अशी धमकी इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून देण्यात आली.

दरम्यान, इराणच्या मदतीला येमेनमधील हुथी बंडखोर आले आहेत. येमेनमधील हुथी बंडखोरांनी अमेरिकेला टोकाचा इशारा दिला आहे. इराण-इस्रायल युद्धामध्ये अमेरिका सहभागी झाली तर लाल समुद्रातील अमेरिकन जहाजांवर आणि युद्धनौकांवर हल्ले करू, अशी धमकी हुथी बंडखोरांनी एक व्हिडीओ जारी करत दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;