Air India Crash – अहमदाबाद विमान अपघातात आतापर्यंत 247 मृतदेहांचे DNA जुळले, चित्रपट निर्माते महेश जीरावाला यांचे निधन

Air India Crash – अहमदाबाद विमान अपघातात आतापर्यंत 247 मृतदेहांचे DNA जुळले, चित्रपट निर्माते महेश जीरावाला यांचे निधन

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली. या अपघातातील आतापर्यंत 247 मृतदेहांची ओळख पटली असून, त्यातील 232 मृतदेह त्यांच्या नातेवाइकांकडे सोपवण्यातल आले आहे. तर उर्वरित 8 जणांच्या नातेवाइकांचे डीएनए जुळलेले नाहीत म्हणून नवीन डीएनए घेण्यास सांगण्यात आले आहे.

अहमदाबादचे चित्रपट निर्माता महेश जीरावाला यांचेही अपघातात निधन झाल्याचे डीएनए चाचणीमधून स्पष्ट झाले आहे. या अपघातानंतर जरीवाला बेपत्ता होते, या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे.

अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. राकेश जोशी यांनी माहिती दिली की, शनिवार संध्याकाळपर्यंत 247 मृतदेहांचे डीएनए जुळवून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. संबंधित मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला असन यातील 232 मृतदेह नातेवाइकांना देण्यात आले आहेत. आतापर्यंत ओळख पटवलेल्यांमध्ये 187 भारतीय, 52 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिकांचा समावेश आहे.

विमान दुर्घटनेनंतर बेपत्ता असलेले गुजराती चित्रपट दिग्दर्शक महेश जीरावाला यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटवण्यात आली आणि नंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 34 वर्षीय जीरावाला आपल्या दुचाकीवरून त्या परिसरातून जात होते, तेव्हाच लंडनला जाणारे विमान एका वसतिगृहावर कोसळले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;