पुतीन म्हणतात, संपूर्ण युक्रेन आमचाच; झेलेन्स्की यांच्या देशावर ठोकला दावा

पुतीन म्हणतात, संपूर्ण युक्रेन आमचाच; झेलेन्स्की यांच्या देशावर ठोकला दावा

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची आग धुमसत असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी संपूर्ण युक्रेन आमचाच असा दावा केला आहे. रशियन आणि युक्रेन नागरिक एक असून युक्रेन उद्ध्वस्त करण्याचा रशियाचा कोणताही इरादा नाही असे त्यांनी म्हटले आहे. पुतीन यांच्या या विधानामुळे युक्रेन आणि त्याच्या पाश्चिमात्य मित्र राष्ट्रांमध्ये चिंता वाढली असून रशिया युक्रेन युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.

रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतीन हे सेंट पिटर्सबर्ग येथे एका कार्यक्रमानिमित्त बोलत होते. पुतीन म्हणाले की, आमच्याकडे एक म्हण प्रसिद्ध आहे. जेथे रशियन सैनिकांचा पाय पडतो ती भूमि रशियाची होते. आपल्या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला पुतीन म्हणाले की, आम्ही युक्रेनच्या आत्मसमर्पनाची मागणी करत नाही. मात्र, शांतता हवी असेल तर किवने मॉस्कोच्या प्रादेशिक लाभांची वास्तविकता स्वीकारायला हवी तसेच नाटोमध्ये सहभागी होण्याचा विचार सोडून द्यावा. मॉस्कोने अनेकवेळा किवला समेटासाठी आवाहन केले आहे. दरम्यान, रशिया युक्रेनच्या केवळ पूर्वेकडील काही भागांवरच नव्हे तर संपूर्ण देशावर आपला अधिकार सांगत असल्याने युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

युक्रेन आत्मघात करतोय!

पुतीन म्हणाले की, युक्रेन स्वतःसाठी समस्या निर्माण करत आहे, सुमी ताब्यात घेण्याचे रशियाचे उद्दीष्ट नाही मात्र, रशिया सुमी शहरावर ताबा मिळवू शकतो. रशियन सैन्य रशियन भूभागावरील हल्ले रोखण्यासाठी युक्रेनच्या ईशान्य सुमी प्रदेशात बफर झोन तयार करत आहे.

ती शेवटची चूक असेल

युक्रेनने डर्टी बॉम्ब वापरला तर कदाचित ती त्यांची शेवटची चूक असेल त्याला आम्ही नक्कीच विध्वंसक प्रतिसाद देऊ असे सांगत पुतीन यांनी युक्रेनला थेट इशाराच दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;