इस्रायल युद्धादरम्यान अयातुल्ला अली खोमेनी यांनी उत्तराधिकारी केले जाहीर, मुलाच्या नावाचा समावेश नाही

इस्रायल युद्धादरम्यान अयातुल्ला अली खोमेनी यांनी उत्तराधिकारी केले जाहीर, मुलाच्या नावाचा समावेश नाही

इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खोमेनी यांनी इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान आणि इस्रायलकडून हत्येच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर आपले संभाव्य उत्तराधिकारी म्हणून तीन वरिष्ठ मौलवींची नावे जाहीर केली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये त्यांचा मुलगा मोजतबा खोमेनी यांचा समावेश नाही. ज्यांना यापूर्वी उत्तराधिकारी म्हणून तयार केले जात असल्याची चर्चा होती. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, खोमेनी यांनी ही नावे इस्रायलच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेमुळे आणि युद्धकाळातील आपत्कालीन योजनेच्या अंतर्गत जाहीर केली आहेत.

इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढत असताना अयातुल्ला अली खोमेनी यांना तेहरानच्या ईशान्य भागातील लव्हिझान येथील एका सुरक्षित भूमिगत बंकरमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब, त्यात त्यांचा मुलगा मोजतबा यांचाही समावेश आहे. खोमेनी यांनी इलेक्ट्रॉनिक संवाद बंद करून विश्वासू सहकाऱ्यामार्फत संदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून त्यांचे स्थान शोधणे कठीण होईल.

अयातुल्ला अली खोमेनी यांनी इस्रायलच्या हल्ल्यांमुळे मारल्या गेलेल्या लष्करी कमांडरच्या जागी नवीन नेमणुका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवड करणाऱ्या विशेषज्ञ सभेला (Assembly of Experts) आपल्या मृत्यूच्या परिस्थितीत तातडीने उत्तराधिकारी निवडण्याचे निर्देश दिले आहेत. सामान्यत: ही प्रक्रिया अनेक महिने चालते, परंतु युद्धकाळात त्वरित आणि नियंत्रित सत्तांतर व्हावे, तसेच इस्लामिक रिपब्लिक आणि त्यांचा स्वत:चा वारसा सुरक्षित राहावा, यासाठी खोमेनी यांनी तीन नावे सुचवली आहेत. या नावांमध्ये मोजतबा यांचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;