लग्नापूर्वीच 34 मुलांची आई बनली होती प्रिती झिंटा; जाणून घ्या कसं?
बॉलिवूडची 'डिंपल क्वीन' अर्थात अभिनेत्री प्रिती झिंटा आजही अनेकांची लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्रितीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र बऱ्याच काळापासून प्रिती चित्रपटांपासून दूर आहे. 2016 मध्ये तिने जिन गुडइनफसी लग्न केलं.
लग्नाच्या पाच वर्षांनंतर प्रितीने सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलांसोबतचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र हे फार क्वचित लोकांना माहित असेल की प्रिती झिंटा लग्नाआधीच 34 मुलांची आई बनली होती.
प्रितीने अनेकदा गरीब मुलांची आणि महिलांची मदत केली आहे. 2009 मध्ये तिने तिच्या 34 व्या वाढदिवशी ऋषिकेशमधील मदर मिरेकल अनाथाश्रमातल्या 34 मुलींना दत्तक घेतलं. एका जुन्या मुलाखतीत प्रितीने याविषयीचा खुलासा केला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List