लाल साडी, भांगेत सिंदूर; ‘पुष्पा 2’च्या सेटवरून लीक झाला रश्मिकाचा लूक

लाल साडी, भांगेत सिंदूर; ‘पुष्पा 2’च्या सेटवरून लीक झाला रश्मिकाचा लूक

मुंबई : 21 मार्च 2024 | दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी ‘पुष्पा : द रुल’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यावर्षी 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा’चा पहिला भागसुद्धा थिएटरमध्ये जबरदस्त हिट ठरला होता. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. गेल्या काही महिन्यांपासून ‘पुष्पा 2’ची शूटिंग सुरू आहे. याआधी सेटवरील अल्लू अर्जुनचा लूक लीक झाला होता. त्यानंतर आता चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लीक झालेल्या फोटोमध्ये रश्मिका वधूच्या वेशभूषेत पहायला मिळतेय.

‘पुष्पा 2’च्या सेटवर रश्मिकाने लाल रंगाची साडी नेसली असून तिच्या भांगेत सिंदूरसुद्धा दिसून येत आहे. तिचा हा लूक पाहून ती पुष्पराजसोबत लग्नाचा सीक्वेन्स शूट करत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. रश्मिकाच्या या लूकवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा : द राईज’ हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.

‘पुष्पा : द राइज’ या पहिल्या भागात अल्लू अर्जुनसोबतच रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत होते. अल्लू अर्जुनला ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’देखील मिळाला आहे. यानिमित्ताने अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे. विशेष म्हणजे अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’साठी काहीच फी घेतली नाही. मात्र तरीसुद्धा अल्लू अर्जुन कोट्यवधी रुपयांत कमाई करणार आहे. कारण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या एकूण कमाईपैकी 33 टक्के भाग त्याला मिळणार आहे.

‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंगचे हक्क ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने 30 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता दुसऱ्या भागाचे हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी नेटफ्लिक्सने ॲमेझॉन प्राइम व्हिडीओपेक्षा तिप्पट रक्कम दिली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;