अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर कुमार विश्वास यांची पोस्ट चर्चेत

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर कुमार विश्वास यांची पोस्ट चर्चेत

दिल्लीतील मद्य गैरव्यवहारप्रकरणी गुरुवारी रात्री आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रिपदावर असताना अटक करण्यात आलेले केजरीवाल हे पहिलेच नेते आहेत. अटकेपासून संरक्षण देण्याची केजरीवाल यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर गुरुवारी ईडीच्या पथकाने केजरीवाल यांच्या निवासस्थानाची झडती घेतली आणि रात्री त्यांना अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत केजरीवाल यांना झालेली अटक हा ‘आप’ला बसलेला मोठा हादरा मानला जात आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांचे जुने सहकारी आणि प्रसिद्ध लेखक कुमार विश्वास यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

केजरीवाल यांच्या अटकेचं वृत्त समोर येताच कुमार विश्वास यांनी एक्सवर (ट्विटर) स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते डोकं टेकून नमस्कार करताना दिसून येत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कुमार विश्वास यांनी लिहिलं, ‘कर्मप्रधान विश्व रचि राखा | जो जस करहि सो तस फल चाखा|’ म्हणजेच या विश्वास कर्म हे सर्वांच्या वर आहे. जो जसा कर्म करतो, त्याला तसंच फळ मिळतं असा या ओळींचा अर्थ आहे. कुमार विश्वास यांच्याशिवाय भाजप खासदार मनोज तिवारी यांनीसुद्धा केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत मनोज तिवारी यांनी म्हटलंय, “अरविंद केजरीवाल यांच्याप्रकरणी अखेर तेच घडलं जे अपराध आणि भ्रष्टाचारप्रकरणी घडतं. भ्रष्टाचारी व्यक्तीने कितीही चलाखी केली तरी तो कायद्याच्या जाळ्यात अडकतोच. भ्रमाचं जाळं पसरवून सत्ता हातात घेतली आणि सत्ता मिळाल्यानंतर दिल्लीला लुटलं. त्या अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतल्या लोकांची हाय लागली आहे.”

केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच तुरुंगात असतानाही केजरीवाल हेच मुख्यमंत्री राहतील, असं ‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी स्पष्ट केलं. दिल्लीतील मद्य गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी ईडीने आतापर्यंत अनेकदा केजरीवाल यांना बोलावलं होतं. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला होता. मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना मुख्य आरोपी ठरवण्यात आलं असून हे दोघंही अबकारी शुल्क धोरण ठरवताना केजरीवाल यांच्या संपर्कात होते, असा ईडाचा दावा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;