धक्कादायक… 20 वर्षांच्या मुलीला घाबरवायचा अभिनेता, त्याला पाहताच ती…

धक्कादायक… 20 वर्षांच्या मुलीला घाबरवायचा अभिनेता, त्याला पाहताच ती…

बॉलिवूड विश्वातील ग्लॅमर, प्रसिद्धी, यश इत्यादी गोष्टी अनेकांना आकर्षित करत असतात. पण बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असताना सेलिब्रिटींना अनेक गोष्टींचा सामना कराला लागतो. आता देखील एक अशी घटना समोर येत जी फार कोणाला माहिती नसेल.. एक अभिनेता 20 वर्षांच्या मुलीला घाबरवायचा, अभिनेत्याच्या बाजूला देखील मुलगी कधी बसली नाही… सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता रणदीप हुड्डा आहे. तर ज्या 20 वर्षांच्या मुलीला अभिनेता घाबरवायचा ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री आलिया भट्ट आहे.

रणदीप आणि आलिया यांनी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हायवे’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली. सिनेमात दोघांनी साकारलेल्या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक झालं. पण रणदीप आणि आलिया यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांना आवडली. पण सेटवर दोघे कधीच एकमेकांसोबत बोलले नाहीत.

हायवे सिनेमाची कथा वीरा या मुलीच्या आयुष्याभोवती फिरते, जिचं तिच्या लग्नाच्या एक दिवस आधी अपहरण होते. अपहरण झाल्यानंतर घाबरण्याशिवाय अभिनेत्री अपहरणकर्त्याच्या प्रेमात पडते आणि तिच्या जीवनात एक नवीन अर्थ शोधते. तिचे अपहरण झाल्यानंतर तिला स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अर्थ कळतो…

दरम्यान, नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, ‘आम्ही जेव्हा हायवे सिनेमाचं शुटिंग करत होतो. तेव्हा 20-25 दिवस आलिया हिच्यासोबत काहीही बोललो नाही. कारण ती जुहू येथे राहणारी मुलगी आहे. तिला बाहेरच्या जगातील सत्य माहिती नव्हतं. त्यामुळे माझ्या प्रती तिच्या मनात असलेली भीती सिनेमाच्या कथेसाठी फार गरजेची होती. ती मला घाबरत होती. मी देखील कधी तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला नाही. ती कधी माझ्या बाजूला देखील बसायला आली नाही. या सर्व गोष्टी सिनेमात हव्या होत्या…’ असं अभिनेता म्हणाला.

रणदीप यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. कोणी ‘गॉडफादर’ नसताना रणदीप बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचला. आज रणदीप याला कोणत्याही ओळखीची गरज नाही…

रणदीप याचा आगामी सिनेमा

भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर ऊर्फ वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डा याने सिनेमात वीर सावरकर यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमा 22 मार्च रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रणदीप हुड्डा याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता अमित सियाल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;