हेच तुम्ही पुरुषांना विचारणार का? लग्नानंतरच्या ‘त्या’ प्रश्नावरून भडकली रकुल

हेच तुम्ही पुरुषांना विचारणार का? लग्नानंतरच्या ‘त्या’ प्रश्नावरून भडकली रकुल

मुंबई : 21 मार्च 2024 | लग्नानंतर सासरचे मंडळी तुला विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करण्यास सांगतात का, असा प्रश्न विचारणाऱ्याला अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने सडेतोड उत्तर दिलं आहे. 21 फेब्रुवारी रोजी रकुलने निर्माता जॅकी भगनानीशी लग्न केलं. लग्नानंतर ती नुकतीच ‘लॅक्मे फॅशन वीक 2024’मध्ये ग्लॅमरस अंदाजात झळकली. यावेळी तिला कपड्यांच्या निवडीवरून प्रश्न विचारण्यात आला. लग्नानंतर तुझ्या फॅशनमध्ये बदल झाला पाहिजे, अशी सासरच्या मंडळींची अपेक्षा असते का, असा सवाल रकुलला करण्यात आला.

या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, “नाही, माझ्या आणि जॅकीच्या कुटुंबीयांबाबत मी खूप नशीबवान ठरले आहे. माझ्या मते भारतीय समाजात लग्न या गोष्टीकडे खूप वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं. पण ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रियाच आहे. तुम्हा एखाद्या पुरुषालाही हाच प्रश्न विचारणार का? लग्नानंतर तू तुझ्या पोशाखात बदल करशील का, असा सवाल तुम्ही पुरुषाला कराल का? ऑफिसला तू अत्यंत चमकणारे कपडे घालून जा, असं आपण सांगू का? नाही ना. काळ बदलला आहे आणि प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार वागतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

रकुल आणि जॅकीने गोव्यात धूमधडाक्यात लग्न केलं. लग्नापूर्वी दोघं तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते. जॅकी आणि रकुलच्या लग्नाला बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते. या दोघांनी ऑक्टोबर 2021 मध्ये प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तेव्हापासून रकुल आणि जॅकीला विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलंय. लॉकडाऊनदरम्यान एकमेकांशी जवळीक वाढल्याचं रकुलने एका मुलाखतीत सांगितलं होतं. हे दोघं एकमेकांचे शेजारी असल्याने लॉकडाऊनच्या काळात मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

“आमची मैत्री आणि नातं अत्यंत सहजपणे सुरु झालं होतं. आम्ही मित्र म्हणून एकमेकांसोबत वेळ घालवत होते आणि तीन-चार महिन्यांतच आम्हाला एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झाली होती. आम्ही एकमेकांचे शेजारी आहोत हे आम्हाला सुरुवातीला माहीतसुद्धा नव्हतं. इतक्या वर्षांत आमच्यात कधी मैत्रीसुद्धा झाली नव्हती. पण लॉकडाऊनमध्ये सर्वकाही जुळून आलं”, असं तिने सांगितलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;