उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार, अस्सल शिवसेनेचा उद्या 59 वा वर्धापन दिन सोहळा

उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार, अस्सल शिवसेनेचा उद्या 59 वा वर्धापन दिन सोहळा

भूमिपुत्र मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत आणि ओजस्वी विचारांतून पाच दशकांपूर्वी शिवसेनेचा जन्म झाला. आपल्याच राज्यात परका झालेल्या मराठी माणसाला शिवसेनाप्रमुखांनी अन्यायाविरुध्द जागरूक केले. त्यांच्या मनगटात लढण्यासाठी बळ दिले. शिवसेना या चार अक्षरांचे अभेद्य कवच मराठी माणूस आणि महाराष्ट्राभोवती उभे केले. महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी अविरत लढणाऱया अस्सल शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन गुरुवार, 19 जून रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मोठय़ा दिमाखात संपन्न होणार आहे. या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

मराठी माणसांवर होणाऱया अन्यायाच्या वेदनेतून 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसाची तगमग आणि बाळासाहेबांची तळमळ यातून शिवसेना उदयाला आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या अन्यायाविरुद्ध मराठी माणसाला जागृत केले. मुंबईसह महाराष्ट्रात मराठी माणसाचे अस्तित्व शिवसेनेमुळेच टिकून राहिले. कालांतराने शिवसेनेने हिंदुत्वाची कास धरून समग्र हिंदुस्थानातील हिंदूंचा आवाज बुलंद केला. हिंदूंसाठी लढे उभारले. आंदोलने केली. हिंदूंमध्ये धर्माभिमानाचा वन्ही चेतवला. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे अत्यंत समर्थपणे चालवत आहेत.

देशातील वातावरण सध्या अस्थिर आहे. राज्यातही अनागोंदी कारभार सुरू आहे. लोकप्रतिनिधींअभावी संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. विधानसभा निवडणुकीतही घोटाळा करून महायुती सत्तेवर आली आहे. या सर्व परिस्थितीला जनता पंटाळली आहे. शिवसेना हाच यावर पर्याय असल्याचे जनतेने मनाशी ठरवले असून मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांवर पुन्हा भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसैनिकांसह तमाम जनतेने केला आहे. आता वर्धापनदिनी उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार, कोणता संदेश देणार याबद्दल प्रसारमाध्यमे आणि मुंबई महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय तज्ञांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड महाराष्ट्रातून पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याच्या प्रवेशिका मुंबईतील विभागप्रमुखांमार्फत वितरीत करण्यात येणार असून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर आसन व्यवस्था असणार आहे, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

‘प्रवास आपल्या शिवसेनेचा’ तुफान व्हायरल

वर्धापन दिनानिमित्त बनवलेला ‘प्रवास आपल्या शिवसेनेचा’ हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 13 ऑगस्ट 1960 रोजी ‘मार्मिक’ सुरू केले. तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला. 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा, पहिला मोर्चा, मुंबई पालिकेत स्वबळावर मिळवलेला विजय, शिवशाही सरकार, विश्वविक्रमी रक्तदान महायज्ञ, युवासेनेची स्थापना आणि उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी असे टप्पे व्हिडीओत आहेत. महाराष्ट्र हितासाठी सुरू केलेला हा प्रवास अविरत चालणार, असे अभिवचनही त्यात देण्यात आले आहे.

  • ‘महाराष्ट्र रक्षणासाठी लढलेल्या लढय़ाची, खंबीरपणे साथ दिलेल्या शिवसैनिकांच्या निष्ठेची 59 वर्षे’ अशी पोस्ट शिवसेनेच्या एक्स हँडलवर शेअर करण्यात आली आहे. त्यावर ‘जय महाराष्ट्र’, ‘वर्धापन दिनाच्या शुभेच्छा’, ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’, अशा उदंड शुभेच्छांचा वर्षाव शिवसेनाप्रेमी जनतेने केला आहे.

स्थळ – षण्मुखानंद सभागृह
वेळ – सायंकाळी 5 वाजता

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;