वरळी पोलीस कॅम्पमध्ये सिमेंट काँक्रीटचा जलकुंभ उभारण्यासाठी विशेष निधी द्या, आदित्य ठाकरे यांचे अर्थमंत्र्यांना पत्र

वरळी पोलीस कॅम्पमध्ये सिमेंट काँक्रीटचा जलकुंभ उभारण्यासाठी विशेष निधी द्या, आदित्य ठाकरे यांचे अर्थमंत्र्यांना पत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात येणाऱ्या पोलीस कॅम्पमधील पाण्याच्या 20 टाक्यांपैकी 12 टाक्या फुटल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा जलकुंभ उभारावा व त्यासाठी विशेष निधी द्यावा अशी मागणी करणारे पत्र आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांना लिहले आहे.

”मी प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळी विधानसभा मतदार संघाअंतर्गत वरळी पोलीस कॅम्प इमारत क्र. 1 ते 36 या शासकीय पोलीस वसाहतीकरिता पाणीपुरवठ्यासाठी 10 लाख लीटर क्षमतेचा सिमेंट काँक्रीटचा जलकुंभ होता. परंतु धोकादायक परिस्थितीमुळे तो निष्कासित करण्यात आला असून. त्यांनतर, तात्पुरता पर्याय म्हणून सिंटेक्सच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. परंतु या 20 टाक्यांपैकी 12 टाक्या सध्या फुटलेल्या स्थितीत आहेत. यासाठी कायमस्वरूपी पर्याय म्हणून त्याच ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा जलकुंभ बसविणे आवश्यक आहे. तरी सदर निवेदनाद्वारे मी आपणास नम्र विनंती करतो की, आपण या कामासाठी विशेष निधी वर्ग करून संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत”,असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;