IPL मध्ये अनोख्या सेलिब्रेशनमुळे वादग्रस्त ठरलेल्या दिग्वेश राठीचा भेदक मारा, 5 चेंडूत घेतल्या 5 विकेट; पाहा Video

IPL मध्ये अनोख्या सेलिब्रेशनमुळे वादग्रस्त ठरलेल्या दिग्वेश राठीचा भेदक मारा, 5 चेंडूत घेतल्या 5 विकेट; पाहा Video

आपल्या फिरकीच्या जादूने आणि विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करण्याच्या अनोख्या शैलीमुळे दिग्वेश राठी संपूर्ण IPL मध्ये चर्चेत होता. त्याला अनेक वेळा दंडीतही करण्यात आलं होतं. लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळताना त्याने दमदार कामगिरी केली. त्याची हीच गोलंदाजीची धार पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. एका स्थानिक टी-20 सामन्यात त्याने 5 चेंडूंमध्ये 5 खेळाडूंना तंबुत धाडलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोएंका यांनी दिग्वेश राठीचा व्हिडीओ शेअर केला आहे. एका लोकल सामन्यामध्ये विरोधी संघाला जिंकण्यासाठी 36 चेंडूंमध्ये 113 धावांची गरज होती. 151 धावांवर 5 विकेट अशी त्यांची अवस्था होती. तेव्हा दिग्वेशच्या हातात चेंडू सोपवण्यात आला. त्याने 15 व्या षटकामध्ये पाच चेंडूंमध्ये पाच विकेट घेतल्या आणि 151 या धावसंख्येवरच फलंदाजी करणारा संपूर्ण संघ बाद झाला. त्याचा व्हिडीओ लखनऊ सूपर जायंट्स आणि संघ मालक संजीव गोएंका यांनी सुद्धा शेअर केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;