महायुती सरकारचे ट्रान्सफर सत्र सुरुच, चार वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

महायुती सरकारचे ट्रान्सफर सत्र सुरुच, चार वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्याच्या प्रशासनात बदल्यांचे सत्र सुरुच असून आज चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये मुंबई, ठाणे, अमरावती, वर्धा, नागपूर आणि बीड येथील प्रशासकीय पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

कोणत्या अधिकारीही कुठे झाली बदली?

पराग सोमन (आयएएस:एससीएस:2014): मुंबई मेट्रो रिजन स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी, ठाणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असलेले पराग सोमन यांची आता वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सचिन कालंत्रे (आयएएस:एससीएस:2014): अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त असलेले सचिन कालंत्रे यांची पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) येथे उपमहासंचालक (Deputy Director General) म्हणून बदली करण्यात आली आहे.

सौम्या शर्मा-चांदक (आयएएस:आरआर:2018): नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सौम्या शर्मा-चांदक यांची आता अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

जिथिन रहमान (आयएएस:आरआर2020): वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले जिथिन रहमान यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;