एक सामना, तीन सुपर ओव्हर अन् धुरळा; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा विक्रम

एक सामना, तीन सुपर ओव्हर अन् धुरळा; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा विक्रम

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच सामन्यात तीन सुपर ओव्हरचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला आहे. जिद्द, चिकाटी आणि विजयश्री खेचून आणण्यासाठी केलेलं जीवाचं रान आणि त्यामुळे खेळल्या गेलेल्या तीन सुपर ओव्हर. या रोमांचकारी आणि थरारक सामन्यात अखेर तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडने नेपाळचा पराभव करत इतिहास रचला आहे.

स्कॉटलंड, नेदरलँड आणि नेपाळ या तीन संघांमध्ये तिरंगी मालिका स्कॉटलंडमध्ये सुरू आहे. या मालिकेतील नेदरलँडविरुद्ध नेपाळ हा टी-20 सामना सोमवारी (16 जून 2025) स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडने 152 धावा करत नेपाळला 153 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात नेपाळने सुद्धा 152 धावांपर्यंत मजल मारत सामना बरोबरीत सोडवला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 19 धावा केल्या, प्रत्युत्तरात नेदरलँडने सुद्धा 19 धावा केल्या. सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला, नेदरलँडने प्रथम फलंदाजी केली आणि 17 धावा केल्या. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला आणि नेपाळच्या दीपेंद्र सिंहने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत सामना पुन्हा बरोबरीत सोडवला. मात्र तिसऱ्या सूपर ओव्हरमध्ये जॅक लायन-कॅशने नेपाळच्या दोन्ही फलंदाजांना भोपळाही फोडून न देता बाद केलं. त्यामुळे नेदरलँडला जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज होती. फलंदाजीला आलेल्या मायकल लेव्हिटने षटकार खेचत सामना आपल्या खिशात घातल.

कसोटी मालिकेत हिंदुस्थानचीच सरशी, माजी धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडनचे भाकीत

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;