असीम मुनीर, तुम कायर हो! अमेरिकेत पाक लष्करप्रमुखाविरोधत घोषणा; पाहा VIDEO

असीम मुनीर, तुम कायर हो! अमेरिकेत पाक लष्करप्रमुखाविरोधत घोषणा; पाहा VIDEO

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर याच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान वॉशिंग्टन डीसी येथे त्यांच्याविरोधात तीव्र निदर्शने झाली. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाच्या समर्थकांनी ही निदर्शने आयोजित केली होती. निदर्शकांनी असीम मुनीर याला ‘पाकिस्तान्यांचा कातिल’, आणि ‘मास मर्डरर’ अशा घोषणा देत त्याच्यावर मानवाधिकार हनन आणि लोकशाहीचा खून केल्याचा आरोप केला. याचा व्हिडीओही समोर आला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, असीम मुनीर हा रविवारी (15 जून) पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी वॉशिंग्टन येथे दाखल झाला आहे. हा दौरा पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील लष्करी आणि सामरिक सहकार्य वाढवण्यासाठी आहे, असे सांगितले जात आहे. मात्र त्याच्या दौऱ्याला तीव्र विरोध झाला. वॉशिंग्टनमधील फोर सीझन्स हॉटेलबाहेर PTI समर्थकांनी मोठ्या संख्येने जमून निदर्शने केली. निदर्शकांनी ‘शेम ऑन यू’, ‘असीम मुनीर, तुम कायर हो’ आणि ‘लोकशाहीचा खून करणारा’ अशा घोषणा दिल्या. काहींनी ‘सिव्हिलियन सुप्रिमसी इन पाकिस्तान’ असे नारेही दिले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये निदर्शकांचा संताप दिसून येत आहे. एका व्हिडीओत मुनीर याचा ताफा फोर सीझन्स हॉटेलमध्ये पोहोचताना दिसतो, तर निदर्शक त्याच्यावर जोरदार घोषणाबाजी करताना दिसतात. याशिवाय वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्ये फिरत्या डिजिटल व्हॅन्सवर ‘मास मर्डरर असीम मुनीर’ आणि ‘जेव्हा बंदुक बोलते तेव्हा लोकशाही मरते’ असे संदेश दाखवणारे बॅनर लावण्यात आले आहेत. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्येही अशा प्रकारचे बिलबोर्ड दिसले, ज्यामध्ये मुनीर याच्यासह पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि नवाझ शरीफ यांच्यावर टीका करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;