Air India Plane Crash – लेकाला अखेरचा निरोप देताना 90 वर्षांच्या बापाचा शोक मन हेलावणारा, पुष्करराज सभरवाल यांच्या अश्रूंचा बांध फुटला

Air India Plane Crash – लेकाला अखेरचा निरोप देताना 90 वर्षांच्या बापाचा शोक मन हेलावणारा, पुष्करराज सभरवाल यांच्या अश्रूंचा बांध फुटला

अहमदाबादमधील विमान अपघातात 56 वर्षांच्या कॅप्टन सुमित सभरवाल यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. सुमित सभरवाल यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी सुमित सभरवाल यांचे वडील पुष्करराज सभरवाल यांचा शोक पाहून उपस्थित सर्वच गहिवरले. लेकाला अखेरचा निरोप देताना 90 वर्षांच्या पुष्करराज सभरवाल यांचा कंठ दाटून आला अन् अश्रू अनावर झाले. पुष्करराज सभरवाल यांच्या हुंदक्यांनी वातावरणात स्मशान शांतता पसरली होती. उपस्थित सर्वांना हे चित्र वेदनादायी होते.

पुष्करराज सभरवाल हे मुलाच्या पार्थिवाजवळ काही वेळ उभे राहिले. त्यांनी हात जोडले आणि प्रार्थना केली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. पोटचा लेक गेल्याने त्यांना अतीव वेदना आणि दुःख झाले, रडू कोसळले. यावेळी त्यांच्या मुलीने त्यांना धीर दिला.

सुमित सभरवाल यांचे पार्थिक आज सकाळी अहमदाबादवरून मुंबईत आणण्यात आले. यानंतर त्यांचे पार्थिव जलवायू विहार येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. नातेवाई आणि स्थानिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर चकाला येथे सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;