माधुरी दीक्षितच्या गाण्यावर 73 वर्षीय आजींचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

माधुरी दीक्षितच्या गाण्यावर 73 वर्षीय आजींचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

मुंबई | 20 मार्च 2024 : कोणतीही गोष्ट करायची असल्यास सर्वात आधी तर मनाची तयारी लागते. जर मी हे केलं तर लोकं काय बोलतील… असा विचार केल्यास आपण जगणं विसरून जावू… अशात काही व्यक्ती असतात ज्या कोणताच विचार न करता फक्त मला माझी आवड जोपासायला आवडत आहे आणि ती जोपासणार… फक्त जिद्द मनात ठेऊन काही व्यक्त आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करतात. अशात एका 73 वर्षीय आजींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या ज्या आजी बाईंची चर्चा रंगली आहे. त्यांचं नाव छोबी असं आहे. त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला. ‘डान्स दिवाने’ शोमध्ये छोबी यांनी दमदार एन्ट्री करत धकधक गर्लच्या ठेका धरला. डान्स सुरु झाल्यानंतर छोबी म्हणतात, हैं ‘माधुरी जी स्वागत नहीं करोगी हमारा…’, त्यानंतर त्यांचा डान्स पाहून प्रत्येकाला प्रचंड आनंद झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

सध्या सर्वत्र छोबी यांच्या डान्स व्हिडीओची चर्चा रंगली आहे. छोबी यांचा डान्स पाहिल्यानंतर शोचे जज सुनिल शेट्टी आणि माधुरी दीक्षित देखील हैराण होतात. छोबी यांनी दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या ‘देवदास’ सिनेमातील ‘हम पे ये किसने हरा रंग डाला’ गाण्यावर ठेका धरला… व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

छोबी यांचा डान्स पाहिल्यानंतर हैराण झालेल्या माधुरी हिने देखील त्यांच्यासोबत ठेका धरला. पुढे छोबी यांचं कौतुक करत माधूरी म्हणाली, ‘तुम्ही आम्हाला खरं तर जगायला शिकवलं आहे. जे मनात आहे ते करा… घाबरु कधीच नका…’, छोबी यांच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

माधुरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री फक्त उत्तम अभिनेत्री नाहीतर, नृत्यांगना देखील आहे. माधुरी हिने कथक या शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे.  अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःच्या डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते. आज माधुरी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;