आम्हाला मारून टाकायचं आहे का…? नातीला असं का म्हणाल्या जया बच्चन?
बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते. सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे बिग बी यांची नात नव्या नवेली नंदा हिची. नव्या कायम तिच्या ‘व्हाट द हेल नव्या’ या शोमुळे चर्चेत असते. नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये नव्या हिने आजी जया बच्चन आणि आई श्वेता नंदा यांच्या आवडत्या पदार्थांबद्दल सांगितलं. पण गप्पा सुरु असताना ‘आम्हाला मारून टाकायचं आहे का…?’ असं जया बच्चन म्हणाल्या.
सांगायचं झालं तर, शोमध्ये प्रत्येकाने स्वतःच्या आवडत्या पदार्थांबद्दल सांगितलं. नव्याला तिखट पदार्थ प्रचंड आवडतात. जर नव्या जेवणात तिखट नसेल तर ती खाऊ शकत नाही. जोपर्यंत तिच्या डोळ्यातून पाणी निघत नाही तोपर्यंत ती जेवली आहे असं तिला वाटत नाही. याबद्दल खुद्द नव्या हिने सांगितलं आहे.
नव्या म्हणाली, ‘एके दिवशी मी सांगितली की मी सर्वांसाठी पास्ता बनवते. मी लसूण आणि मिरची घतली त्यानंतर तिखट देखील घातलं… पास्ता प्रचंड तिखट झाला होता. आजी आणि अगस्त्य यांनी पास्ता खाल्ला आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं…’
पुढे नव्या म्हणाली, ‘दोघांना देखील प्रचंड तिखट लागलं होतं. तेव्हा आजी आणि अगस्त्य मला म्हणाले आम्हाला मारून टाकणार आहेस का? एवढं तिखट कोण करतं…’ जया बच्चन म्हणाल्या, ‘नव्या जेवताना कायम हिरवी मिर्ची घेते… ती सर्व काही खाते. पण तिला राजमा बिलकूल आवडत नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र नव्या नंदा आणि जया बच्चन यांची चर्चा रंगली आहे.
नव्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, नव्या अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन यांची मुलगी आहे. श्वेता बच्चन यांनी 1997 साली उद्योजक निखील नंदा यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहे. नव्या आणि अगस्त्य….
कुटुंब बॉलिवूडमधील असून देखील नव्या हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला नाही. नव्या वयाच्या 21 व्या कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करत आहे. तर अगस्त्य याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. . ‘द अर्चिज’ सिनेमातून बिग बींच्या नातवाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List