अंकिता लोखंडेचे ‘अच्छे दिन’ सासूबाईंचे बदलले सूर, व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणाल…

अंकिता लोखंडेचे ‘अच्छे दिन’ सासूबाईंचे बदलले सूर, व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणाल…

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने 2021 मध्ये उद्योजक विकी जैन याच्यासोबत लग्न केलं आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली अंकिता सध्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमा सिनेमामुळे चर्चेत आहे. गुरुवारी सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. स्क्रिनिंगसाठी अंकिता हिच्या कुटुंबासोबत सासूबाई देखील पोहोचल्या होत्या. तेव्हा अभिनेत्रीच्या सासूबाई अंकिताचं कौतुक करताना दिसल्या… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे आणि तिच्या सासूबाईंची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या सासूबाईंचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अंकिताच्या सासूबाई दिसताच पापाराझींनी त्यांना सिनेमा कसा वाटला? असा प्रश्न विचारला यावर सासूबाई म्हणाल्या, ‘आधी सिनेमा पाहू तरी द्या… अंकिता तर कायम चांगली दिसते… आमची अंकिता ए वन आहे… सिनेमात देखील ए वन दिसत असणार… जशी सून हवी होती तशीच सून भेटली आहे…’ असं देखील अंकिता लोखंडे हिच्या सासूबाई म्हणाल्या. सध्या सर्वत्र अंकिता हिच्या सासूबाईंच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

व्हायरल व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आता कळलं अंकिता ए वन आहे…’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नाती बदलतात…’, तरी नेटकऱ्यांनी अंकीता हिच्या सासूबाईंचा विरोध करत आहेत. तर काही मात्र अंकिता हिच्या सासूबाईंचं कौतुक करत आहेत…

भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर ऊर्फ वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डा याने सिनेमात वीर सावरकर यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमा 22 मार्च रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे.  सिनेमात रणदीप हुड्डा याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता अमित सियाल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;