कंगना रनौत लवकरच अडकणार लग्नबंधनात? लग्नाच्या तयारीला सुरुवात, मोठी माहिती समोर

कंगना रनौत लवकरच अडकणार लग्नबंधनात? लग्नाच्या तयारीला सुरुवात, मोठी माहिती समोर

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहे. नेकांनी त्यांच्या जोडीदारासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे… नुकताच अभिनेत्री रकूल प्रित सिंग आणि जॅकी भगनानी यांनी लग्न केलं. त्यांच्यानंकर पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा यांनी देखील लग्न केलं. आता मिळत असलेल्या माहितीनुसार अभिनेत्री कंगना रनौत हिच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कंगना कधी लग्न करणार या प्रतीक्षेत चाहते गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. अशात आता जी माहिती समोर येत आहे, त्यामुळे चाहते देखील आनंद व्यक्त करत आहेत.

रिपोर्टनुसार, कंगना हिने स्वतःच्या लग्नासाठी लेहेंगा तयार करण्यासाठी दिला आहे. कंगना अशा एका डिझायनरकडून लेहेंगा तयार करुन घेणार आहे, जो बॉलिवूड विश्वातील तर आहे, पण प्रसिद्ध नाही… कंगना ही गोष्टी फार गुपित ठेवली आहे. एवढंच नाही तर, कंगना कोणासोबत लग्न करणार याबद्दल देखली कोणती माहिती समोर आलेली नाही. शिवाय कंगना हिने देखील यावर कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

सांगायचं झालं तर, कंगना कायम कोणत्याही चालू मुद्द्यावर स्वतःचं ठाम मत माडंते. ज्यामुळे अभिनेत्रीला वादग्रस्त परिस्थितीचा देखील सामना करावा लागतो. पण कंगना स्वतःच्या लग्नाबद्दल काहीही बोलत नाही… अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरु आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी कंगना हिने स्वतःच्या लग्नावर आणि कुटुंबावर मोठं वक्तव्य केलं होतं.

काय म्हणाली होती कंगना रनौत?

‘प्रत्येक मुलगी स्वतःचं लग्न आणि कुटुंबाचे स्वप्न पाहत असते. मी पूर्णपणे कौंटुबिक व्यक्ती आहे. माझ्यासाठी माझं कुटुंब फार महत्त्वाचं आहे. मला लग्न करायचं आहे आणि मला स्वतःचं कुटुंब हवं आहे. पुढच्या चार ते पाच वर्षांमध्ये होऊन जाईल…’ असं अभिनेत्री म्हणाली होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे चाहते अभिनेत्रीच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.

कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कायम वादाचा मुकूट स्वतःच्या डोक्यावर मिरवणारी कंगना कधी आणि कोणासोबत लग्न करेल… या प्रश्नाचं उत्तर येणारी वेळच देऊ शकेल… सोशल मीडियावर देखील कंगनाच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;