लग्नानंतर प्रेम संपत, पण…; लग्नाच्या 10 वर्षांनंतर असं का म्हणाली राणी मुखर्जी?

लग्नानंतर प्रेम संपत, पण…; लग्नाच्या 10 वर्षांनंतर असं का म्हणाली राणी मुखर्जी?

झगमगत्या विश्वात कोणाचं नातं कधी घटस्फोटापर्यंत पोहोचेल सांगता येत नाही. पण अभिनेत्री राणी मुखर्जी हिने सिनेमा दिग्दर्शक, निर्माता आदित्या चोप्रा यांच्यासोबत लग्न केलं आणि लग्नाच्या अनेक वर्षांनंतर देखील दोघे सुखी संसार करत आहेत. राणी तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी बोलताना दिसते. पण आता अभिनेत्रीने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एका योग्य कारणामुळे लग्न केलं पाहिजे. कारण अनेक महिलांना लग्नानंतर वाईट नात्यात अडकताना मी पाहिलं आहे… असं राणी म्हणाली…

लग्न आणि वैवाहिक आयुष्याबद्दल राणी म्हणाली, ‘मला असं वाटतं आदित्य एक उत्तम पुरुष आहे. मी अशा घरात मोठी झाली आहे, जेथे लोकांचा आदर, सन्मान कसा करायचा हे मला शिकवलं आहे. माझ्या आयुष्यात याच गोष्टीचं फार महत्त्व आहे. आदित्य पाहिलं तेव्हा इतरांप्रती त्याची वागणूक मला आवडली. टीममध्ये त्याची लिडरशीप पाहून मी आकर्षित झाली…’

पुढे राणी म्हणाली, ‘आदित्य प्रचंड फेअर आहे… फक्त त्वचेने नाही तर, मनाने देखील… सुरुवातील तुम्ही प्रेम असल्यामुळे एकमेकांकडे आकर्षित होता. पण लग्नानंतर प्रेम कमी होतं. पण मनात असलेला आदर आणि सन्मान कधीही कमी होत नाही. मी जग फार जवळून पाहिलं आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. माझ्या आयुष्यात इंडस्ट्रीमधील पुरुषाची एन्ट्री होणार होती तर, आदित्य याच्याशिवाय दुसऱ्या कोणाची झाली नसती… असं देखील अभिनेत्री म्हणाली.

‘कभी अलविदा न केहना’ सिनेमाचं उदाहरण देत राणीने सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ‘अशा अनेक महिला आहेत, ज्या लग्न केलंय म्हणून आयुष्य जगत आहेत. नात्यात कधीच स्वतःचे विचार मांडू शकत नाहीत. काही वर्षांनंतर त्या वृद्ध होतात आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तरुण मुलगी असताना मी त्या सिनेमात भूमिका बजावली होती. म्हणून त्या सिनेमामुळे मला जोडीदार निवडण्यात मदत झाली. तेव्हा मला कळलं लग्न एका योग्य कारणासाठी झालं पाहिजे. जर तुम्ही चुकीच्या कारणामुळे लग्न करत असाल तर संपूर्ण आयुष्य खराब होईल…’

लग्न आणि वैवाहिक आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आदर आहे. कारण लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांमध्ये असलेलं आकर्षण कमी होतं. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर, तुमच्यामध्ये त्याग करण्याची तयारी असते. सांगायचं झालं तर, राणी आणि आदित्य यांनी 2014 मध्ये लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी देखील आहे. तिचं नाव अदिरा असं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;