Pune Bridge Collapse : इंद्रायणी पूल दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर

Pune Bridge Collapse : इंद्रायणी पूल दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, मावळ तालुक्यातील येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल आहे. रविवार दुपारी 3:30 च्या सुमारास हा लोखंडी पूल कोसळल्याची घटना घडली असून लोखंडी पुलाच्या ठिकाणी अंदाजे 100 पर्यटक वर्षा विहारासाठी आले होते.या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी 18 व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;