Air India Plane Crash – अहमदाबादमधील विमान अपघातानंतर 11A सीटची मागणी वाढली, लकी जागा मिळवण्यासाठी प्रवाशांचा आटापिटा

Air India Plane Crash – अहमदाबादमधील विमान अपघातानंतर 11A सीटची मागणी वाढली, लकी जागा मिळवण्यासाठी प्रवाशांचा आटापिटा

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात आपत्कालीन खिडकीजवळ बसलेला प्रवासी चमत्कारीकरित्या बचावला. विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 242 लोक होते. यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला तर केवळ एकमेव प्रवासी विश्वकुमार रमेश हा बचावला. या चमत्कारानंतर विमानातील आपत्कालीन मार्गाजवळील विशेषतः 11A सीटची मागणी वाढली आहे. ट्रॅव्हल एजन्सी आणि बुकिंग एजंटकडे आपत्कालीन एक्झिटजवळील जागेच्या मागणीत प्रवाशांकडून वाढ होत आहे.

सामान्यतः प्रवासी आपत्कालीन एक्झिटजवळ बसणे टाळतात. कारण केबिन क्रू टेकऑफ करण्यापूर्वी या सीटवर असलेल्यांना विशेष सूचना देतात. मात्र प्रवाशांना पाय लांब करून बसण्याची सोय असल्याने या सीटचे तिकिट दर अधिक असतात. तथापि, विमानाचा प्रकार आणि विमानातील वर्गीकरणानुसार आपत्कालीन मार्गाजवळील आसन क्रमांक बदलत असतात.

विमान वाहतूक तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान अपघाताच्या बाबतीत आपत्कालीन एक्झिटजवळच्या जागा कोणतीही अतिरिक्त सुरक्षितता देत नाहीत. परंतु अहमदाबाद येथील विमान अपघातात आपत्कालीन सीटजवळ बसलेला प्रवासी चमत्कारीकरित्या वाचल्यानंतर आपत्कालीन खिडकीजवळील आसन प्रवाशांसाठी मानसिक समाधान देणारे ठरत आहे. यामुळे या सीटला मागणी वाढली आहे. काही प्रवाशांनी तर 11A सीटचीच विनंती केली आहे, मग ती एक्झिटच्या दरवाजाजवळ असो वा नसो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यात गुंड शाहरुख शेख चकमकीत ठार पुण्यात गुंड शाहरुख शेख चकमकीत ठार
पुण्यातील टिपू पठाण टोळीतील गुंड शाहरुख ऊर्फ अट्टी रहीम शेख (23) हा रविवारी पहाटे सोलापूर जिह्यातील मोहोळ तालुक्यात लांबोटी येथे...
मुंबई – गोवा महामार्गावर आरवली येथे भगदाड
Pune Bridge Collapse : पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 55 पर्यटक बुडाले, चार ठार, सहा गंभीर
Pune Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, उद्धव ठाकरे यांच्याकडून दुःख आणि संताप!!
राजकोटवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली अवघ्या महिनाभरात भगदाड, चिऱ्यांनी बांधलेला पाया खचला; फडणवीस-मिंध्यांचा महाभ्रष्ट कारभार
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले, 7 ठार… महाराष्ट्रातील दाम्पत्यासह चिमुकलीचा मृत्यू
ब्रिटनच्या लढाऊ विमानाचे केरळमध्ये इमर्जन्सी लँडिंग