मुंबईतील अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत करण्यात आली वाढ

मुंबईतील अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत करण्यात आली वाढ

मुंबईमधील बीकेसी येथील अमेरिकी दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी एका फोन कॉलद्वारे देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच बीकेसी पोलिसांना तातडीने सूचित करण्यात आले. पोलीस आणि बॉम्ब निरोधक पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराची तपासणी केली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

मिळालेल्या, अमेरिकी दूतावासाला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून बॉम्बने इमारत उडवण्याची धमकी दिली. या धमकीमुळे प्रशासनात खळबळ उडाली. बीकेसी पोलीस ठाण्याला माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. बॉम्ब निरोधक पथकासह (Bomb Detection and Disposal Squad) पोलिसांची विशेष टीम घटनास्थळी दाखल झाली आणि दूतावासाच्या परिसराची तपासणी केली. तासाभराच्या तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक साहित्य आढळले नाही.

दरम्यान, बीकेसी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, धमकी देणारा कॉल कोणत्या क्रमांकावरून आला, याचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. कॉलरची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक तपास आणि फोन कॉलच्या रेकॉर्डची छाननी केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाला गंभीरपणे घेतले असून, धमकीमागील हेतू आणि व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;