Sindhudurg News – देवगडमध्ये एसटी आणि ट्रकची समोरासमोर धडक, एक जण जखमी

Sindhudurg News – देवगडमध्ये एसटी आणि ट्रकची समोरासमोर धडक, एक जण जखमी

एसटी आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघातात एसटी चालक जखमी झाल्याची घटना देवगडमध्ये घडली. ज्ञानेश्र्वर शंकर जायभाये असे जखमी एसटी चालकाचे नाव असून त्यांच्या पायाला आणि पोटाला दुखापत झाली आहे. जायभाये यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच देवगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

तरळे-देवगड एसटी शिरगावहून देवगडच्या दिशेने येत होती तर ट्रक देवगडहून धान्य उतरवून कुडाळच्या दिशेने जात होता. यादरम्यान दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास जामसंडे कट्टा येथील तीव्र वळणावर एसटी आणि ट्रकची एकमेकांना धडक झाली. या अपघातात एसटी चालक जायभाये जखमी झाले. त्यांना तात्काळ देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी देवगडमधील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. केवळ एसटी चालक किरकोळ जखमी झाले असून यात एसटीचे 60 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. ट्रकचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;