Rain Forecast : राज्यभरात पावसाचे धूमशान! रत्नागिरी आणि रायगडला रेड अलर्ट; कुठे कसा असेल पाऊस? वाचा

Rain Forecast : राज्यभरात पावसाचे धूमशान! रत्नागिरी आणि रायगडला रेड अलर्ट; कुठे कसा असेल पाऊस? वाचा

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांसाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांना आपत्कालीन परिस्थितीसाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या भागांतही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. रेड आणि ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये NDRF आणि SDRF च्या पथकांना तैनात करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाला पूरपरिस्थिती, भूस्खलन आणि इतर आपत्तींना तोंड देण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, नागरिकांना नदीकाठ, डोंगराळ भाग आणि कमी उंचीच्या परिसरात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;