कुंडमळा येथील दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना

कुंडमळा येथील दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, 32 जण जखमी झाले आहेत. अनेक पर्यटक नदीत वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी कुंडमळा येथील दुर्घटनेबाबत पोस्ट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी आहे. या दुर्घटनेत इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचविण्यात बचाव पथकाला यश मिळू दे, सर्वजण सुखरूप असू देत; हिच ईश्वर चरणी प्रार्थना!”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;