Pune Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 2 जणांचा मृत्यू, 32 जखमी, बचावकार्य सुरू

Pune Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 2 जणांचा मृत्यू, 32 जखमी, बचावकार्य सुरू

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, 32 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत काही जण नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 6 जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले आहे, तर 32 जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

दुर्घटनेचे कारण

पूल कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेने पुण्यातील पायाभूत सुविधांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या दुर्घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;