पवित्र स्नानासाठी नदीत गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने एकाच कुटुंबातील 5 तरुण गोदावरीत बुडाले

पवित्र स्नानासाठी नदीत गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने एकाच कुटुंबातील 5 तरुण गोदावरीत बुडाले

मंदिरात दर्शनापूर्वी गोदावरी नदीत पवित्र स्नानासाठी गेलेले पाच तरुण बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पाचही तरुण एकाच कुटुंबातील होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने सर्व मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत.

मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेले पीडित कुटुंब सध्या हैदराबादमधील चिंतल येथे वास्तव्यास आहे. एकाच कुटुंबातील 18 सदस्य रविवारी तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील मंदिर नगरी बसर येथे दर्शन आणि पवित्र स्नानासाठी गेले होते. दर्शनापूर्वी पाच तरुण धार्मिक विधीसाठी नदीवर गेले. तेथे पवित्र स्नान करताना तरुण खोल पाण्यात गेले आणि बुडाले.

कुटुंबीयांनी आरडाओरडा करताच स्थानिकांनी धाव घेतली. स्थानिकांनी तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो व्यर्थ ठरला. पाचही तरुणांचा बुडून मृत्यू झाला. राकेश, विनोद, मदन, रुतिक आणि भरत अशी मृतांची नावे आहेत, हे सर्व 20 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. सर्व मृतदेह भैंसा येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;