स्वॅगचं भारी! स्कुल बस नव्हे तर रोल्स रॉयस मध्ये गाठला शाळेचा पहिला दिवस
वसईमध्ये मुलाच्या शाळेतील पहिलाच दिवस यादगार व्हावा यासाठी चक्क बापाने आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी रोल्स रॉयस गाडी आणि त्यासोबत पाच गाड्यांचा ताफा घेत मुलाला शाळेत सोडलं. पेशाने शिक्षक असलेले नवीत भोईर यांनी मुलाचा शाळेतील हा आगळावेगळा प्रवेश सोहळा केला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच वायरल होत आहे.
वसईतील कामण येथे राहणारे नवीत भोईर हे कामणच्या खिंडी पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्या 4 वर्षाच्या मुलाचा वसईच्या विद्या विकासनी शाळेत पहिला दिवस होता. मुलाचा हा दिवस आठवणीत राहण्यासाठी या शिक्षकाने कमालीची कल्पना लढवली. आपल्या मुलाला चक्क रोल्स रॉयस या महागड्या गाडीतून शाळेत सोडलं. या गाडी सोबत पाच आणखीन दिमतीला गाड्या होत्या. सर्व गाड्यांना सजावट करण्यात आली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List