रिक्षा न चालवता महिन्याला पाच लाख रुपये कमावणारे रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर, 12 जणांची चौकशी

रिक्षा न चालवता महिन्याला पाच लाख रुपये कमावणारे रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर, 12 जणांची चौकशी

मुंबईत महिन्याला पाच लाख रुपये कमावणाऱ्या रिक्षा चालक पोलिसांच्या रडारवर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकासह 12 जणांची चौकशी केली आहे. मुंबईतील बीकेसी मधील अमेरिकन वकिलातीबाहेर व्हिसा अपॉईंटमेंटसाठी येणाऱ्या नागरिकांना आपल्या वस्तू आणि बॅग आत नेण्यास परवानगी नसते. तेव्हा वकिलाती बाहेर असलेले रिक्षाचालक त्यांच्या वस्तू आणि बॅगची देखरेख करतात. आणि त्याचे हजारो रुपये घेतात. अशा प्रकारे हे रिक्षाचालक महिन्याला पाच ते आठ लाख रुपये कमावत होते. आता पोलिसांनी या रिक्षाचालकांना चौकशीसाठी बोलवले होते.

व्हेन्युमाँक कंपनीचे सह-संस्थापक राहुल रुपाणी यांनी LinkedIn वर एक पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली होती. यूएस कॉन्स्युलेटमध्ये व्हिसा अपॉईंटमेंटसाठी जाताना त्यांना आपली बॅग आत नेऊ दिली गेली नाही. अशा परिस्थितीत, कॉन्स्युलेटच्या बाहेर उभ्या असलेल्या एका रिक्षाचालकाने त्यांची बॅग एक हजार रुपये घेऊन सुरक्षित ठेवण्याची ऑफर दिली. अशा प्रकारे हे रिक्षा चालक महिन्याला रिक्षा न चालवता लाखो रुपये कसे कमावतात याची माहिती दिली होती.

व्हॉट अन् आयडिया! मुंबईतला रिक्षाचालक महिन्याला कमावतो 5 लाख

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्या रिक्षाचालकासह आणखी 12 जणांना चौकशीसाठी बोलावले होतं. हे सर्व जण अमेरिकन वकिलातीबाहेर ‘लॉकर’ स्वरूपात सेवा देत होते. BKC पोलिस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वकिलातीच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव पार्किंगसुद्धा बंदी आहे. रिक्षाचालकांना केवळ प्रवासी नेण्याची आणि आणण्याची परवानगी आहे. तसेच या रिक्षाचालकांकडे वकिलातीत आलेल्या लोकांच्या वस्तू आणि बॅग सांभाळण्याची कुठलाही परवानगी किंवा लॉकर सिस्टमचा परवाना नाही. त्यामुळे काहीजण तर जवळच्या दुकांनांमध्ये बॅगा ठेवत होते. या प्रकारामुळे कुठलीही वस्तू हरवल्यास किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर चूक ठरू शकते असे पोलिसांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;