मुंबईत मुसळधार पावसांच्या प्रमाणात वाढ, अवघ्या चार तासांत अतिवृष्टीच्या 28 घटना; पालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती

मुंबईत मुसळधार पावसांच्या प्रमाणात वाढ, अवघ्या चार तासांत अतिवृष्टीच्या 28 घटना; पालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती

मुंबईत मुसळधार पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच फक्त चार तासांच्या अवधीत 28 वेळा अतिवृष्टी झाली आहे. मुंबई महानगर पालिकेने केलेल्या अंतर्गत विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. पालिकेने Automatic Weather System तंत्रज्ञानाच्या माध्यमतून मुंबईच्या पावसाची नोंद केली. आणि या नोंदीच्या आकडेवारीतून हे विश्लेषण केले आहे. 26 मे रोजी मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्याच पार्श्वभूीवर पालिकेने ही पाहणी केली होती. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार 2014 ते 2018 या कालावधीत जेव्हा मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला, तेव्हा एक दिवसातील सरासरी पावसाचे प्रमाण 131 मिमी इतके होते. मात्र 2019 ते 2024 या कालखंडात हे प्रमाण वाढून 182 मिमी इतके झाले. विशेष म्हणजे 25 जुलै 2024 रोजी मुंबईत 267 मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या दहा वर्षातला हा सर्वात मोठा मुसळधार पाऊस ठरला होता.

केवळ 4 तासांत अतिवृष्टी
गेल्या दहा वर्षांत 4 तासांच्या आत अतिवृष्टी झाल्याच्या 28 घटना नोंदवण्यात आल्या आहेत. एकूण पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे या पावसामुळे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दरवर्षी उपाययोजना करूनही मुंबईत सतत पाणी भरण्याच्या घटना वाढत आहेत अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बंगर यांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;