ब्रिटिश फायटर जेटचे केरळमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग, इंधन संपल्यामुळे पायलटने मागितली होती परवानगी

ब्रिटिश फायटर जेटचे केरळमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग, इंधन संपल्यामुळे पायलटने मागितली होती परवानगी

केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ब्रिटिश F-35 फायटर जेटचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जेटमध्ये इंधन संपले होते. ते इंधन भरण्यासाठी पायलटने रात्री 9.30 च्या सुमावार इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ अधिकाऱ्यांनी F-35 ची सुरक्षित लँडिंग करण्यासाठी संपूर्ण विमानतळावर आणिबाणी जाहीर केली होती. हे विमान सध्या विमानतळावरच उभे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतरच विमानात इंधन भरले जाईल.

जगातील सर्वात धोकादायक फायटर जेट F-35
हे अत्याधुनिक फिफ्थ जनरेशन स्टेल्थ फायटर जेट असून ते सध्या हिंद महासागरात तैनात आहे. हे जेट जगातील सर्वात धोकादायक फायटर जेट मानले जाते. अलीकडेच या जेटने भारतीय नौदलासोबत संयुक्त लष्करी सरावात भाग घेतला होता. हे फिफ्थ जनरेशन फायटर जेट ब्रिटनच्या युद्धनौका HMS Prince of Wales च्या कॅरिअर स्ट्राइक ग्रुपचा भाग आहे, जे सध्या ऑपरेशनमध्ये गुंतलेले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;