गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही, 12 मृतदेह कुटुंबीयांकडे सुपुर्द

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही, 12 मृतदेह कुटुंबीयांकडे सुपुर्द

अहमदाबादमध्ये विमान अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे. डीएनए टेस्टमधून आतापर्यंत 31 जणांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यापैकी 12 मृतदेह हे नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. दुसरीकडे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची अद्याप ओळख पटलेली नाही. अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलने सांगितले की डीएनएच्या माध्यमातून विजय रुपाणी यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण यात अद्याप यश मिळालेले नाही. दुसरीकडे या अपघातात जखमी झालेल्या 13 जणांवर उपचार सुरू आहेत.

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे कार्य अजूनही सुरू आहे अशी माहिती डॉ. रजनीश पटेल यांनी दिली आहे. एकूण मृतांपकैकी 31 जणांची ओळख पटली असून 12 मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;