मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट
मुंबईत आज मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातली पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला यलो अलर्ट जारी केला आहे. आज सकाळी मुंबईत पावसाने हजेरी लावली, पण कुठेही पाणी भरल्याचे वृत्त नाही. दुसरीकडे ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातली पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List