दैवी चमत्कारच! ढिगाऱ्याखाली 3 महिन्यांचं बाळ जिवंत सापडलं, बचाव पथकाने व्यक्त केले आश्चर्य

दैवी चमत्कारच! ढिगाऱ्याखाली 3 महिन्यांचं बाळ जिवंत सापडलं, बचाव पथकाने व्यक्त केले आश्चर्य

इस्रायल आणि इराणमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना इराणकडूनही जशास तसे उत्तर मिळत आहे. दोन्ही देश एकमेकांविरुद्ध अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करत आहेत. बॅलेस्टिक मिसाईल्स आणि ड्रोनने शहरंची शहरं उडवली जात असून हा संघर्ष आगामी काळात आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

शुक्रवारी पहाटे इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले. इराणने 150 हून तेल अविवर 150 हून अधिक मिसाईल्स डागली. यानंतर इस्रायलने पुन्हा एकदा इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केला. इराणच्या ऑईल डेपोसह गॅस रिफायनरीवर क्षेपणास्त्र डागण्यात आली. यामुळे आगीचा भडका उडाला. त्यानंतर इराणनेही इस्रायलमधील उत्तरेकडील शहरांना लक्ष्य केले. तसेच तेल अविवसह जेरुसलेम, रिशोन लेझिओन शहारांवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमुळे अनेक इमारती ध्वस्त झाल्या. या हल्ल्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून 19 जखमी झाले आहेत. यादरम्यान, क्षेपणास्त्रामुळे भस्मसात झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका 3 महिन्यांच्या बाळाला जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.

इराणने तेल अविवपासून दक्षिणेस 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या रिशोन लेझिओन शहरावर क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यात अनेक इमारतींचे नुकसान झाले. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी इस्रायलकडून बचाव मोहीम राबवण्यात आली. यावेळी ढिगाऱ्याखालून 3 महिन्यांच्या बाळाला जिवंत बाहेर काढण्यात आले. इस्रायल पोलिसांनीही यास दुजोरा दिला आहे. या बाळाला किरकोळ दुखापत झाली असून बचाव पथकाने तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले.

याबाबत माहिती देताना बचाव पथकाती एका कर्मचाऱ्याने सांगितले की, ढिगाऱ्याखाली आम्हाला 3 महिन्यांचे बाळ जिवंत सापडले. मी आधी त्याला हातात घेतले आणि ते जिवंत असल्याचे पाहून पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवले. त्यानंतर बाळाच्या कुटुंबियांनाही सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले, असे वृत्त टाइम्स ऑफ इस्रायलने दिले आहे. तसेच या इमारतीच्या खाली आणि शेजारच्या घरातही काही लोक अडकले होते. आगही लागली होती, असेही बचाव पथकातील कर्मचाऱ्याने सांगितले.

इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडताच आकाशात विमानांचे ट्रॅफिक जॅम, जगभरातील एअरलाईन्सनी बदलले मार्ग

संघर्ष वाढणार

इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही देश घातक हत्यारांचा वापर करत असून यामुळे जीवित आणि वित्तहानीही मोठ्या प्रमाणात होत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 78 नागरिकांचा मृत्यू झाला आणि 320 हून अधिक जखमी झाल्याचा दावा इराणने संयुक्त राष्ट्रात केला आहे.

Israel-Iran War – इराणकडून आगीत ‘तेल’; युद्धाचा भडका, इस्रायलवर हल्ला करत इमारती लक्ष्य

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;