BSF जवानाने सहकाऱ्यावर झाडल्या 13 गोळ्या, जवानाचा जागीच मृत्यू

BSF जवानाने सहकाऱ्यावर झाडल्या 13 गोळ्या, जवानाचा जागीच मृत्यू

एका बीएसएफ जवानाने आपल्याच सहकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपी एस.के मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. मृत जवानानेच नाव रतन लाल सिंह असून दोघांची पश्चिम बंगालमध्ये पोस्टिंग होती.

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये रतन लाल सिंह आणि एस.के. मिश्रा हे बीएसएफच्या 119 मध्ये तैनात होते. शनिवारी दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला. दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. दोघांमध्ये हाणामारी झाल्यानंतर इतर सहकाऱ्यांनी त्यांना अडवलं. पण मिश्रा याच्या डोक्यात तिडीक गेली होती. तेव्हा मिश्राने आपल्या रायफलमधून रतन लाल यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात रतन लाल गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मिश्राला अटक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;