प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर ऐश्वर्याने सोडलं मौन; म्हणाली..

प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर ऐश्वर्याने सोडलं मौन; म्हणाली..

मुंबई : 20 मार्च 2024 | ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा नुकत्याच एका होळी पार्टीत बेशुद्ध झाली होती. यानंतर तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं. ऐश्वर्या गरोदर असल्याने तिला पार्टीत भोवळ आल्याचं म्हटलं गेलं. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्स करत ऐश्वर्या शर्मा आणि तिचा पती नील भट्टला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. आता खुद्द ऐश्वर्याने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित या चर्चांवर मौन सोडलं आहे. ऐश्वर्याने या पोस्टमध्ये चक्कर येण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

गरोदरपणाच्या चर्चांवर पोस्ट लिहित ऐश्वर्याने स्पष्ट केलं, ‘मी तिसऱ्यांदा ही गोष्ट मोठ्याने ओरडून सांगतेय. कारण मला सतत लोकांचे मेसेज येतायत आणि त्यांना सांगून मी वैतागले आहे. कृपया तुम्ही खोटे अंदाज वर्तवणं बंद करा. मी सर्वसामान्य माणूस आहे, त्यामुळे कधी-कधी माझा रक्तदाब कमी होऊ शकतो. तुमच्या माहितीकरता मी सांगू इच्छिते की माझा रक्तदाब 60-80 इतका खाली आला होता आणि त्यामुळेच मी बेशुद्ध झाले होते. मी गरोदर नाही.’

ऐश्वर्याची पोस्ट-

ऐश्वर्या शर्मा एका होळीच्या इव्हेंटदरम्यान डान्सचा सराव करताना बेशुद्ध झाली होती. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी नेण्यात आलं होतं. काही तास आराम केल्यानंतर ऐश्वर्या पुन्हा एकदा शूटिंगला आली होती. ऐश्वर्याने अभिनेता नील भट्टशी नोव्हेंबर 2021 मध्ये लग्न केलं. ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या मालिकेत ऐश्वर्या खलनायकी भूमिकेत होती. म्हणून नीलसोबतच्या लग्नानंतर तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या दोघांनी ‘बिग बॉस 17’ या शोमध्येही एकत्र भाग घेतला होता.

ऐश्वर्या तिच्या भूतकाळातील रिलेशनशिपमुळेही चर्चेत आली होती. नील भट्टशी लग्न करण्यापूर्वी ती राहुल पंड्याला डेट करत होती. ऐश्वर्या आणि नील बिग बॉसच्या घरात असताना राहुलने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने ऐश्वर्यावर आरोप केले होते. नंतर ऐश्वर्या जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली, तेव्हा तिने राहुलच्या आरोपांना उत्तर दिलं होतं.

“माझं आणि राहुलचं ब्रेकअप 2014 मध्येच झालं होतं. त्याचा ॲटिट्यूडच आमच्या ब्रेकअपचं कारण होतं. मी अभिनय क्षेत्रात काम करणं सोडून दिलं पाहिजे, असं तो मला म्हणायचाय. मी का सोडू ॲक्टिंग? मी अभिनेत्री बनायला आली आहे तर साहजिकच मी अभिनय करेन. त्याने अजूनही बरंच काही म्हटलं होतं. ते मी इथे मुलाखतीत सांगूही शकत नाही. म्हणूनच मी त्याच्याशी ब्रेकअप केला होता. आमचं नातं त्याच वेळी संपुष्टात आलं होतं”, असं तिने स्पष्ट केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;