Ahmedabad Plane Crash – एअर इंडिया विमान दुर्घटनेचा इंडिगो आणि स्पाइसजेटलाही फटका, शेअर्समध्ये मोठी घसरण

Ahmedabad Plane Crash – एअर इंडिया विमान दुर्घटनेचा इंडिगो आणि स्पाइसजेटलाही फटका, शेअर्समध्ये मोठी घसरण

एअर इंडिया विमान दुर्घटनेचा शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. टाटाच्या शेअर्सनंतर आता इंडिगो आणि स्पाइसजेटच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. दुर्घटनेनंतर काही क्षणातच इंडिगो आणि स्पाइसजेटचे मार्केट कॅप हजारो कोटी रुपयांनी कमी झाले. इंडिगोचे शेअर मार्केट कॅप 7,458.46 कोटी रुपयांनी घसरले. स्पाइसजेटचे मार्केट कॅप 152.55 कोटी रुपयांनी घसरले.

एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर गुरुवारी टाटा समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्याचवेळी स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये सुमारे 2.6 टक्क्यांनी घट होत 5,437.50 रुपयांवर आला. तर इंडिगोच्या शेअर्समध्ये 3.4 टक्क्यांनी घट होऊन 44.30 रुपयांवर आला.

आधीच मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे आणि ट्रम्पच्या टॅरिफमुळे हिंदुस्थानी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. त्यात एअर इंडिया विमान दुर्घटनेमुळे आणखीन भर पडली. दुपारी 3 वाजता बीएसई सेन्सेक्स 823.16 अंकांनी घसरून 81,691.98 वर आणि एनएसई निफ्टी 253.20 अंकांनी घसरून 24,888.20 वर बंद झाला.

अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान गुरुवारी दुपारी टेकऑफनंतर काही क्षणातच मेघनानीनगर परिसरात कोसळले. या विमानात 10 क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते. दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेतील मृत्यू आणि जखमींचा निश्चित आकडा अद्याप समोर आला नाही. मात्र, या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;