Air India Plane Crash – कॅप्टन सुमित सबरवाल यांनी दुर्घटनेपूर्वी एटीएसला पाठवला होता धोक्याचा संदेश

Air India Plane Crash – कॅप्टन सुमित सबरवाल यांनी दुर्घटनेपूर्वी एटीएसला पाठवला होता धोक्याचा संदेश

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानीमध्ये Air India चं विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची शंका वर्तवली जात आहे. अपघातस्थळावरून आकाशात धुराचे लोळ उठत आहेत. विमान कोसळल्याचे कळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दुर्घटनेपुर्वी पायलटने जवळच्या एटीएसला धोक्याचा संदेश पाठवला होता. त्यानंतर थोड्याच वेळात हे विमान कोसळले.

 

Ahmedabad Plane Crash- 625 फूट उंचीवर पोहोचलेले विमान, उड्डाणाच्या 1 मिनिटातच कोसळले

अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत असताना एअर इंडियाचे विमान कोसळले. या विमानात सुमारे 242 प्रवासी होते. अपघातापूर्वी वैमानिकाने एटीसीला सिग्नल दिला होता, अशी माहितीही मिळत आहे. आता विमान अपघाताबाबत काही माहिती समोर आली आहे. विमानाच्या पायलटने अपघातापूर्वी जवळच्या एटीसीला सिग्नल पाठवला होता. त्यात त्यांनी धोक्याचा संकेत दिला होता.

कोण होते पायलट…
या विमानात एकूण 242 प्रवासी होता. त्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. कॅप्टन सुमित सभरवाल हे विमान उडवत होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर त्यांच्यासोबत होते. सुमित सबरवाल यांना 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर क्लाईव्ह यांना 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टीवरून दुपारी 1.39 वाजता उड्डाण केले. उड्डाण करताच पायलटने जवळच्या एटीसीला मेडे…मेडे….मेडे कॉल दिला. त्यानंतर काही वेळातच ही दुर्घटना घडली.

काय असतो मेडे कॉल
‘मेडे कॉल’ हा कोणत्याही विमानातील आपत्कालीन संदेश असतो. विमान गंभीर संकटात असताना आणि प्रवाशांच्या किंवा क्रूच्या जीवाला धोका असताना पायलट हा संदेश देतो. विमानाच्या इंजिनात बिघाड, विमानाला आग लागणे, हवेत टक्कर होण्याचा धोका किंवा अपहरणासारखी परिस्थिती असताना पायलट जवळच्या एटीएसला संदेश पाठवतो.. या कॉलद्वारे पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) आणि जवळच्या विमानांना सूचना देतो की विमानाला तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. विमानाच्या रेडिओवर तीन वेळा “मेडे, मेडे, मेडे” असे म्हटले जाते. त्यावरून विमान संकटात असल्याची माहिती मिळते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्किन केअरमध्ये वापरले जाणारे कोरफड जेल तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते का? जाणून घ्या तज्ञांकडून स्किन केअरमध्ये वापरले जाणारे कोरफड जेल तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते का? जाणून घ्या तज्ञांकडून
प्रत्येक ऋतूत त्वचा चमकदार ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. तर काही लोकं महागडे स्किन केअर प्रोडक्ट विकत घेऊन त्वचेवर...
बाजारात मिळणारे चॉकलेट चिप्स कुकीज बनवा घरच्या घरी, ‘ही’ आहे सोपी रेसिपी
केसांची वाढ होण्यासाठी ‘या’ 5 नैसर्गिक घटकांचा करा वापर, वरदानापेक्षा नाहीत कमी
गंगाधाम चौक परिसरात सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत अवजड वाहनांना बंदी, पोलीस आयुक्तांसह अधिकाऱ्यांकडून पाहणी
बद्धकोष्ठता, गॅस या समस्यांनी त्रस्त असाल तर, नाभीमध्ये तेल घाला! वाचा सविस्तर
Air India Plane Crash – अपघाताच्या वेळी तापमान पोहोचलं होतं एक हजार अंश सेल्सियसवर, प्रवाशांसोबत वितळलं विमान
Skin Care – त्वचा उजळ होण्यासाठी चेहऱ्यावर कच्चे दूध लावताना, हा एक पदार्थ मिसळा! वाचा