Air India Plane Crash – अमित शहा तातडीने अहमदाबादकडे रवाना

Air India Plane Crash – अमित शहा तातडीने अहमदाबादकडे रवाना

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने खळबळ उडाली. लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे हे विमान उड्डाणानंतर काही क्षणात कोसळले. अपघातग्रस्त विमानामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश असल्याचे समोर येत आहे. त्यांचे विमान तिकीट आणि बोर्डिंग पासचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीही सक्रिय झाले असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यानंतर अमित शहा आणि राम मोहन नायडू हे तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. या दरम्यान, अमित शहा यांनी विमान अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांशीही चर्चा केली आहे आणि अपघातातील पीडियांना सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी एअर इंडियाच्या विमान अपघातावर दु:ख व्यक्त केले. विमान अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला. आम्ही सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. विमान वाहतूक आणि आपत्कालिन प्रतिसाद संस्थांना सर्वोतोपरी मदतीचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.

Air India Plane Crash- अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;