14 तास नाॅनस्टाॅप कर्करोगाची शस्त्रक्रिया, दीपिका कक्करची भावूक पोस्ट

14 तास नाॅनस्टाॅप कर्करोगाची शस्त्रक्रिया, दीपिका कक्करची भावूक पोस्ट

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला यकृताचा कर्करोग झाला आहे. हा कर्करोग स्टेज दोनचा असल्याचे तिने सांगितले आहे. याबाबत दीपिकाने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. आता नुकतीच तिची शस्त्रक्रिया झाली आहे. ही शस्त्रक्रिया होण्यासाठी तब्बल 14 तास लागले. इतक्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर आता तिची तब्येत ठीक असल्याचे तिचा नवरा शोएब इब्राहिमने दिली आहे.

धक्कादायक! बिग बॉस सीझन 12 च्या विनरला कर्करोगाची लागण, इन्स्टाग्रामवर केला खुलासा

अलिकडेच शोएब इब्राहिमने एक व्लॉग शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने शस्त्रक्रियेनंतर दीपिकाची झलक दाखवली आहे. ज्यामध्ये तिच्या मानेवर एक पट्टी बांधलेली दिसत आहे. यावेळी तिच्या डोळ्यात अश्रूही होते. दीपिकाची 14 तासांची शस्त्रक्रिया झाली आणि ती आता बरी आहे. ती थोडीशी खात-पितही आहे. आता ती लवकरच बरी होणार आहे, असे शोएब म्हणाला. यावर दीपिकाचे डोळे पाणावले. आता शस्त्रक्रियेनंतर मी जास्त भावनिक झाले आहे. मी छोट्या-छोट्या गोष्टींवर रडू लागते, असे दीपिका म्हणाली.

यानंतर शोएबच्या व्लॉगमध्ये शोएब आणि दीपिकाची आई दीपिकाला भेटायला आल्याचे दिसले. आणि मुख्य म्हणजे दीपिकाचा मुलगा रुहानही त्यांच्यासोबत आला होता. रुहानला पाहून दीपिका खूप आनंदी झाली. रुहानही त्याच्या आईला पाहून खूप खूष झाला. एकंदरीतच या व्लॉगच्या माध्यमातून दीपिकाची शस्त्रक्रियेनंतरची तब्येत कशी आहे, याचा अंदाज चाहत्यांनी लावला.

दीपिका कक्कड़ ने कैंसर सर्जरी के बाद शेयर किया पहला पोस्ट, लिखा- 'अल्लाह सब ठीक कर देगा

दरम्यान, आता दीपिकाने शस्त्रक्रियेनंतर सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. दीपिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पोस्टवर चाहत्यांनी दीपिकाला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दीपिकाला कर्करोगाची लागण झाल्याची बातमी आल्यापासून चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;