No emotion, no love , no f××k! दोन दिवसांपूर्वी पोस्ट केली अन् लाखो फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुयन्सरचा आज मृतदेह आढळला

No emotion, no love , no f××k! दोन दिवसांपूर्वी पोस्ट केली अन् लाखो फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुयन्सरचा आज मृतदेह आढळला

सोशल मीडियावर वेगवेगळ्या रिल्स शेअर करून प्रसिद्धीच्या झोतात आलेली पंजाबची इन्फ्लुयन्सर कमल कौर भाभी उर्फ कांचन कुमारा हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. भटिंडा येथील आदेश मेडिकल विद्यापीठातील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये कमल कौर हिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ही हत्या आहे की आत्महत्या हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, भटिंडाच्या आदेश मेडिकल विद्यापीठाच्या परिसरात उभ्या कारमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. ही कार बराच काळापासून पार्किंगमध्ये उभी होती. दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गाडीचा दरवाजा उघडला आणि आत इन्फ्ल्युयन्सर कमल कौर हिचा मृतदेह आढळला.

पार्किंगमधील गाडीमध्ये आढळलेल्या मृतदेहाची पोलीस चौकशीदरम्यान ओळख पटली. सोशल मीडियावर जवळपास 4 लाख फॉलोअर्स असलेली कमल कौर भाभी हिचा तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. ज्या कारमध्ये तिचा मृतदेह आढळला ती कारही तिच्याच नावावर रजिस्टर असल्याचेही समोर आले. प्राथमिक चौकशीत तिच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या हे स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोण होती कमल कौर?

कमल कौर ही लुधियानाची रहिवासी होती. इन्स्टाग्रामवर वादग्रस्त आणि अश्लील रिल्स ती बनवत होती. इन्स्टावर तिचे 3.86 लाख फॉलोअर्स होते. अश्लील कंटेंट शेअर करत असल्याने सात महिन्यांपूर्वी तिला दहशतवादी अर्श डल्लाने जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी तिने एक पोस्टही शेअर केली होती. आता तिचा मृतदेह आढळून आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kanchan Kumari (@kamalkaurbhabhi)

भटिंडाचे पोलीस अधीक्षक नरेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बुधवारी रात्री भटिंडा आदेश मेडिकल विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये उभ्या कारमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. ही गाडी बऱ्याच काळापासून इथे उभी होती आणि आजूबाजूच्या लोकांना वास येऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. मृताची ओळखही पटली असून हा मृतदेह प्रसिद्ध इन्फ्लुयन्सर कमल कौरचा असल्याचे समोर आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;