फाटक्या गाड्या, तुटलेल्या खिडक्या अन् गलिच्छ टॉयलेट्स; BSF जवानांसाठी पाठवण्यात आली अस्वच्छ ट्रेन

फाटक्या गाड्या, तुटलेल्या खिडक्या अन् गलिच्छ टॉयलेट्स; BSF जवानांसाठी पाठवण्यात आली अस्वच्छ ट्रेन

त्रिपुराहून अमरनाथ यात्रेत तैनातीसाठी जम्मूला जाणाऱ्या सुमारे 1200 बीएसएफ जवानांना नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेने (एनएफआर) अत्यंत अस्वच्छ ट्रेन उपलब्ध करून दिली. या ट्रेनची अवस्था इतकी दयनीय होती की, जवानांनी त्यात चढण्यास स्पष्ट नकार दिला. हा प्रकार 6 जून 2025 रोजी घडला.

तुटलेल्या खिडक्या आणि गलिच्छ टॉयलेट्स

बीएसएफच्या कंपनी कमांडरने ट्रेनची पाहणी केली असता, त्यांना डब्यांची अत्यंत वाईट अवस्था आढळली. ट्रेनच्या डब्यांमध्ये खिडक्या तुटलेल्या होत्या, दरवाजे खराब होते. सीटांवर गाद्या फाटक्या होत्या आणि टॉयलेट्स गलिच्छ होते. अनेक डबे कित्येक महिन्यांपासून वापरात नसल्याचे दिसून आले. या परिस्थितीमुळे जवानांनी प्रवास करण्यास नकार दिला.

जवानांचा विरोध आणि रेल्वेची प्रतिक्रिया

जवानांनी ट्रेनमध्ये चढण्यास नकार दिल्याने हा मुद्दा रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. बीएसएफने रेल्वेविरोधात तीव्र निषेध नोंदवला. रेल्वेच्या प्रवक्त्या दिलीप कुमार यांनी सांगितले की, एनएफआरने चुकून काही जुन्या डब्यांचा समावेश या विशेष ट्रेनमध्ये केला होता, जे नूतनीकरणासाठी पाठवले जाणार होते. ही चूक लक्षात येताच रेल्वेने तातडीने उपाययोजना केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;