साहेब, अंगावरचे कपडे घ्या, पण कर्जमाफी द्या; प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

साहेब, अंगावरचे कपडे घ्या, पण कर्जमाफी द्या; प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शवला आहे. कडू यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. यानिमित्ताने वर्ध्यातील शेतकऱ्यांनी ‘शेतकरी हक्क मोर्चा’ आयोजित करून सरकारविरोधात निदर्शने केली. यातच आर्वीत बाळा जगताप यांच्या नेतृत्वात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आर्वी तहसील कार्यालयात अंगावरचे कपडे काढत आंदोलन केलं. ‘अंगावरचे कपडे घ्या, पण कर्जमाफी’, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

दरम्यान, बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, दिव्यांगांचे पगार आणि विधवांच्या समस्यांसाठी 17 मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी वर्धा येथील मुख्य चौकात जमून शांततापूर्ण निदर्शने केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;