Weight Loss Diet- वजन कमी करण्यासाठी ज्वारीची की मक्याची भाकरी? कोणती अधिक फायदेशीर

Weight Loss Diet- वजन कमी करण्यासाठी ज्वारीची की मक्याची भाकरी? कोणती अधिक फायदेशीर

बदलत्या जीवनशैलीमुळे आपला आहार आणि इतर सर्व सवयीही बदलत चालल्या आहेत. यामुळे आपल्या वजनावर फार मोठा परीणाम होऊ लागलेला आहे. सध्या कुमारवयीन मुलांपासुन ते सर्वांचेच वजन वाढु लागलेलं आहे. वजनवाढीची ही समस्या सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावु लागली आहे.

वजन कमी करण्याचा विचार केला तर गव्हाच्या पिठाची चपाती कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण गव्हाच्या पिठात फायबर आणि इतर पोषक तत्वांचे प्रमाण चांगले असते, परंतु त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. तसेच काही लोकांना गव्हाची अ‍ॅलर्जी असते. वजन कमी करण्यासाठी ज्वारी आणि मक्याची भाकरी मोठ्या प्रमाणात खातात, कारण सामान्यतः गव्हाच्या पिठाच्या चपात्यांपेक्षा या भाकऱ्या जास्त फायदेशीर मानल्या जातात. तसेच त्यात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज कमी असतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना एक प्रश्न अनेकदा सतावतो तो म्हणजे, वजन कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी जास्त फायदेशीर आहे की मक्याची भाकरी?

ज्वारीची भाकरी की मक्याची भाकरी
आपण वजन कमी करण्याच्या बाबतीत दोन्ही भाकऱ्यांमध्ये फरक जाणून घेऊया. पोषणाच्या बाबतीत दोघांमध्ये कोणताही महत्त्वाचा फरक नाही. 100 ग्रॅम ज्वारीच्या पिठाबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 9.7 ग्रॅम फायबर, 72 ग्रॅम कार्ब्स आणि 360 कॅलरीज असतात.

मक्याच्या पीठाबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 7 ग्रॅम फायबर, 6.8 ग्रॅम प्रथिने, 77 ग्रॅम कार्ब्स असतात आणि कॅलरीजचे प्रमाण प्रति 100 ग्रॅम सुमारे 360 असते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;